ताज्या बातम्यानिधन वार्ता
आमरोळी येथील वारकरी हभप बुधाजी नाईक यांचे निधन

चंदगड :
आमरोळी तालुका चंदगड येथील वारकरी हभप बुधाजी आप्पाजी नाईक वय 70 वर्ष यांचे आकस्मिक निधन झाले त्यांचा अल्प परिचय थोडक्यात, स्व हभप बुधाजी नाईक यांचा स्वभाव मनमिळावू व प्रेमळ असा होता,सामाजिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असायचे ते वारकरी होते पंढरपुरची त्यांची कार्तिकी वारी होती 20 ते 25 वर्षांपासून ते वारकरी झाले होते कीर्तनाला ते नेहमी आवर्जून जात असत तसेच कीर्तनात विणेकरी म्हणून ते सेवा करीत असत तसेच तत्कालीन आमदार व्ही के चव्हाण पाटील,आमदार कै नरसिंगराव पाटील,माजी रो ह यो राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील यांचे ते खंदे कार्यकर्ते होते तर त्यांचा प्रचार करणेत त्यांचा मोलाचा वाटा असायचा त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात 4 मुले ,सुना,नातवंडे,2 विवाहित मुली असा परिवार आहे