ताज्या बातम्यामहाराष्ट्र
व्ही.के.चव्हाण पाटील महाविद्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम उत्साहात.

चंदगड प्रतिनिधी : संदीप देवन
कार्वे(ता. चंदगड) येथील व्ही.के.चव्हाण पाटील महाविद्यालयात 25 जानेवारी 2022 रोजी मतदान जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रॅली काढून मतदान हा हक्क बजावावा यासाठी जनजागृती केली.रॅली दरम्यान अनेक प्रात्यक्षिके, पथनाट्य व मोठंमोठ्याने घोषणा देण्यात आल्या.कोरोनाचे सर्व नियम पाळत विद्यार्थ्यांना एकत्र करून संविधानाविषयी शपथ घेण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.उत्तम पाटील,मार्गदर्शक प्रा.गजानन पाटील,प्रा.के.बी.कलजी विजय गावडे,अनिल कुठ्रे,राजश्री बांदिवडेकर,नामदेव पाटील,युवराज पाटील उपस्थित होते. येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक गावात जाऊन मतदान करण्याविषयी जनजागृती करणेबाबत मानस असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.