गिरगावात फिरंगोजी सामाजिक संस्थेकडून आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

कुडूत्री प्रतिनिधी :
कोविड काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत दारोदार सर्वे करण्याचे काम आशा सेविका ,अंगणवाडी सेविका मदतनीस , ग्रामपंचायत कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेवा करीत आहेत हे ओळखून आर्सेनिक गोळ्यांचे वितरण करण्यात येत असल्याचे उद्गार फिरंगोजी शिंदे बहुउद्देशीय सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद प्रमोद पाटील यांनी काढले. ते फिरंगोजी शिंदे संस्थेमार्फत मार्फत गिरगाव येथील आर्सेनिक अल्बम गोळ्यांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कोविड पॉझिटीव्ह रुग्णाचे प्रमाण पहाता रोज एक नवीन तयार होणारे कोविड सेंटर हि अपुरेच पडत आहे. वरील कर्मचारी सेवा संपल्यानंतर आपल्या कुटुंबामध्ये गेल्यानंतर आपल्या कुटुंबातील वयस्कर आई वडिल, लहान मुले, यांच्याशी संपर्क येणे साहजिकच आहे.इतर वातावरणातील संसर्ग त्यांच्या कुटुंबीयांना होवु नये यासाठी डॉ. दिपा कुष्टे डाँ नंदिनी गावडे, डाँ आश्विनी खोराटे, डाँ सायली मिराशी, अध्यक्ष माधुरी खोत, अरुणा पाटिल याच्या मार्गदर्शना खाली आर्सेनिक या कोरोना प्रतिबंधक होमिओपँथीक औषधाचे मोफत वितरण करण्यात आले.
यापूर्वीही संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. संस्थापक वस्ताद प्रमोद पाटील,भगवान गुरव,हर्षद पाटील, पूर्णानंद जाधव शिवराज पाटील विघ्नेश जाधव विश्वजीत पाटील प्रियंका पाटील यांच्यासह ग्रामसेवक पुनम कांबळे पारिचारिका श्रद्धा आफळे तलाठी तानाजी जाधव उपस्थित होते.