विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँकेचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील मुरगूड येथील विश्वनाथराव पाटील मुरगुड सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थित पार झाला. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे. या योजनेमुळे खऱ्या अर्थाने महिलांचा विकास झाला आहे. अजित पवार यांनी बँकेच्या वाटचालीचे कौतुक केले. बँकेच्या पारदर्शक कारभारामुळे आणि सभासदांनी दाखवलेल्या विश्वासामुळे ही संस्था प्रगतीपथावर आहे. चेअरमन प्रवीणसिंह पाटील आणि संचालक मंडळाने केलेल्या नेतृत्वामुळे अनेक शेतकऱ्यांचे आणि व्यावसायिकांचे जीवनमान उंचावले आहे. असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, सहकार क्षेत्र ही महाराष्ट्राची ताकद आहे. या बँकेसारख्या संस्था जर नाविन्यपूर्ण योजना राबवत राहिल्या, तर निश्चितच ग्रामीण भागातील तरुणांना आणि शेतकऱ्यांना नवी दिशा मिळू शकते.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, मुरगूड सहकारी बँकेचा हा अमृत महोत्सव म्हणजे सहकाराची मूल्ये आणि ग्रामीण विकासाचे प्रतिबिंब आहे. अशा संस्थांमुळे ग्रामीण भागात आत्मनिर्भरतेचे नवे क्षितिज उलगडत आहे. उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन आणि बँकेचे नेतृत्व पाहता, ही संस्था भविष्यातील अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड देईल. स्व. विश्वनाथराव पाटील यांचे बिद्री सहकारी साखर कारखाना उभारणीत मोलाचे योगदान आहे. दूरदृष्टी ठेवून त्यांनी साखर कारखान्याची स्थापना केल्याने आज चार तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर मिळत आहे आणि यामुळेच या परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे.
बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील म्हणाले, संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला येत्या काळात शेतकरी हिताच्या नवकल्पनांवर भर देणार असल्याचे स्पष्ट केले.
ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि युवा उद्योजकांसाठी नवीन आर्थिक योजना राबवण्यात येतील.
कार्यक्रमास बँकेचे चेअरमन प्रवीणसिंह पाटील माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, भैय्या माने, मनोज फराकटे, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील, अमरसिंह माने, बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे, सुधीर सावर्डेकर, दिग्विजय पाटील, सुहासिनीदेवी पाटील, शितल फराकटे, संजय मोरबाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास चौगुले विजय शेट्टी, जहांगीर नायकवडी, राजू सातवेकर, अमोल मंडलिक, सुहास घाटगे, मारुती घाटगे, बाजीराव रजपुत, बाजीराव शिंदे आधी उपस्थित होते.