अमानवी विधवा प्रथा बंद करा मुरगुडच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

मुरगुड प्रतिनिधी :
छत्रपती शाहू महाराज स्मृतीशताब्दी वर्ष सुरू आहे .त्यांच्या पुरोगामी विचारांचा वसा व वारसा आपण जपला पाहिजे .म्हणुनच समाजातील अमानवी विधवा प्रथा बंद झाल्या पाहिजेत असे निवेदन मुरगूडचे माजी नगराध्यक्ष व दुधगंगा वेदगंगा सह.साखर कारखान्याचे संचालक प्रविणसिंह पाटील यांच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.
पतिनिधनानंतर पत्नीचे कुंकू पुसून टाकणे,बांगड्या फोडणे,मंगळसूत्र तोडणे ,जोडवी काढणे,आभूषणे त्यागणे ,एवढेच नव्हे तर कोणत्याही धार्मिक तथा सामाजिक कार्यात भाग घेण्यास तिला प्रतिबंध करणे म्हणजे तिच्या मानवी हक्कांना पायदळी तुडवण्यासारखे आहे .
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य ,समता आणि बंधुता यांचे हक्क बहाल केले आहेत .
छत्रपती शाहू,फुले आंबेडकर या महामानवांनी तर शंभर वर्षांपूर्वीच विज्ञाननिष्ठ पुरोगामी विचारांची पेरणी केली आहे .
शाहूरायांच्या जन्म शताब्दी च्या निमिताने या अमानवी प्रथांना मूठमाती दिली गेली पाहिजे आहे परखड विचार निवेदनाद्वारे मांडण्यात आले आहेत .
दिग्विजय पाटील (भैया),ऍड, सुधीर सावर्डेकर,मा. नगरसेवक राहुल वंडकर, नामदेवराव भांदीगरे, रणजीत मगदूम ,जग्गनाथ पुजारी , शिवाजीराव सातवेकर ,गुरूदेव सूर्यवंशीसंपत कोळी, संजय मोरबाळे, अशोक पाटील ,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष रणजित सूर्यवंशी, रमेश मोरबाळे , दिग्विजय चव्हाण इत्यादि मान्यवरांच्या उपस्थितीत हे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले .
शिरोळ तालुक्यातील हेरवाड या छोट्या गावांमध्ये सुरू झालेला हा प्रवाह वेगाने महाराष्ट्र भर पसरत आहे
मुरगूड नगरीत सुद्धा त्याचे उत्साहात स्वागत होत आहे .