कोल्हापुरातील पॅव्हेलियन मैदान येथे भारतीय तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष व पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील यांच्या हस्ते नव्याने उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तलवारबाजी हॉलची पायाभरणी

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
आज जागतिक तलावाबाजी दिनानिमित्त कोल्हापुरातील पॅव्हेलियन मैदान येथे भारतीय तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष व पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तलवारबाजी हॉलची पायाभरणी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून व महाराष्ट्राच्या लढाऊ वृत्ती अधोरेखित करणारा शिवकालीन तलवारबाजी खेळ आता अनेक आधुनिक साहित्यांमुळे नवे रूप धारण केले आहे. प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये समावेश असलेल्या पाच खेळांमध्ये तलवारबाजी खेळाचा समावेश असल्याने तलवारबाजी खेळाची वेगळी ओळख अधोरेखित होते.
नुकत्याच टोकियो येथे संपन्न झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत तलवारबाजी खेळामध्ये भारताचे प्रथमच प्रतिनिधित्व करणारी तामिळनाडूची भवानी देवीकडून प्रेरित होऊन अनेक खेळाडू या खेळाकडे निश्चितच आकर्षिले जातील.
या सर्व खेळाडूंना आधुनिक साहित्यासह राष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण व इतर सुविधा मिळवून देण्यासाठी पालकमंत्री ना. सतेज पाटील साहेब कोणतीही कसर सोडणार नाहीत याची खात्री आहे. येणाऱ्या काळामध्ये तलवारबाजी खेळामध्ये सुद्धा आपल्याला ऑलम्पिक पदके मिळतील हा विश्वास आहे.यावेळी आमदार ऋतुराज पाटील आणी मान्यवर आणी खेळाडु उपस्थित होते.