शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी पायी दिंडी आंदोलनाने वसूबारस साजरे

सावरवाडी प्रतिनिधी :
शेतकऱ्यांच्या हक्काच्या न्याय मागण्यासाठी गाव भुमी पासुन ते जिल्हाधिकारी कचेरी पर्यत पायी दिंडी काढत आंदोलनाचा नारा देत दिवाळी सणातच आंदोलन छेडत वसूबारस साजरे केले. शेतकर्यांनी या अनोख्या आंदोलनास प्रारंभ कसबा बीड गावच्या भोजराजाच्या नगरीत सोमवारी सकाळी झाला. गाव ते जिल्हाधिकारी कचेरी पर्यतचा शेतक-याच्या लढ्याचा संघर्षमय प्रवास मार्गस्थ झाला.
शेतकऱ्यांचा शेतीचा सातबारा कोरा करा शेती ची सर्व कर्ज माफ करा स्वामीनाथन आयोग ची अंमल बजावणी करा शैक्षणिक कर्ज माफ करा पुरग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या शेती साठी २४ तास वीज पुरवठा करा पेट्रोल डिझेल खते यांचे दर कमी करा आदि मागण्या करीत आंदोलकांनी सकाळी आठ वाजता कसबा बीड गावात प्रारंभ झाला. त्यानंतर मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरील महे कोगे पाडळी खुर्द बालिंगा फुलेवाडी रंकाळा अंबाबाई मंदीर शिवाजी पुतळा दसरा चौक मार्गे जिल्हाधिकारी कचेरी जाऊन निवेदन देण्यात आले आणि झुणका भाकरी खाऊन वसू बारस साजरे केले.
या आंदोलनात शेतकरी नेते मुकुंद पाटील, ॲड प्रकाश देसाई, ॲड किरण पाटील, महे चे सरपंच सज्जन पाटील, एस आर पाटील, एस.डी जरग, सत्यजीत पाटील, जर्नादन दळवी आदिची भाषणे झाली. बैजू पाटील, राजाराम पाटील, राहूल पाटील, बैजू पाटील, अनिल बुवा, दादा देसाई, प्रताप पाटील, रघुनाथ पाटील, शिवाजी लोंढे यांच्या सह शेतकरी उपस्थितीत होते.