नवोदय दुध संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद : तहसिलदार अश्विनी आडसुळ-वरूटे; वाघापुरात प्रधानमंत्री उज्वला गॅस वितरण

गारगोटी प्रतिनिधी :
नवोदय दुध संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत समाज्यासमोर संस्थेने आदर्श निर्माण केला असुन शासनस्तरावरून विविध योजना संस्थेने राबवाव्या त्याकरिता सहकार्य करू असे प्रतिपादन भुदरगड घ्या तहसिलदार अश्विनी आडसुळ-वरूटे यांनी केले.
वाघापूर या.भुदरगड येथे शंभर परिवारांना प्रधानमंत्री उज्वला गॅस चे मोफत वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुदरगड पत्रकार संघाचे अध्यक्ष रविराज पाटील होते.कार्यक्रमास प्रा.धनाजीराव आरडे, शिवाजीराव सावंत,प्रा.विजय कोटकर शिवाजीराव पाटील,सौ.पुनम बाबासाहेब जाधव- भोई,उद्योगपती धीरूज भोपळे प्रमुख उपस्थित होते.
तहसिलदार आडसुळ पुढे म्हणाल्या, गॅस वितरण कार्यक्रम करून महिलांना दिलासा दिला असुन ग्रामीण भागामध्ये चुलीवर स्वयंपाक करताना महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
पत्रकार संघाचे अध्यक्ष रविराज पाटील म्हणाले, अल्पावधीतच संस्थेने दुध व्यवसायाबरोबरच लोकांचे हिताचे प्रकल्प राबवून दिशादर्शक काम सुरू केलेले आहे.
प्रा.धनाजीराव आरडे म्हणाले,केवळ दुध संकलन हाच हेतू न ठेवता सातत्याने ही संस्था समाजोपयोगी कामे करून लोकांच्या विश्वासाला पात्र रहात आहे.
यावेळी आदर्श ग्रामसेवक अरुण दबडे,तलाठी के.एम जरग, मुंबई पोलीस आदित्य कुंभार,आकाश आरडे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास माजी उपसरपंच संजय जठार, देवस्थानचे उपाध्यक्ष सदाशिवराव दाभोळे, डॉ.मा.ग.गुरव,मारूती कामीरकर,नवोदयचे चेअरमन आण्णासाहेब जठार,गणेश पडवळे, भगवान घाटगे,प्रशांत पाटील, दिपक परीट आदी प्रमुख उपस्थित होते.सुत्रसंचलन संग्राम दाभोळे यांनी केले तर आभार संस्थापक चेअरमन अनिल कामीरकर यांनी मानले.