ताज्या बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

नेसरीत विविध व्यक्तींचे सत्कार संपन्न.

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

नेसरी वाचन मंदिर च्या कै. अमित मांजरेकर बाल संस्कार (विकास) केंद्रामार्फत-इ.३ते६वी व इ.७ते९वी अशा दोन गटासाठी घेण्यात आलेल्या ऑन लाईन वक्तृत्व स्पर्धांचे बक्षिस वितरण, नेसरी बाजारपेठेतील तरुण व्यापारी मित्रानी स्वयंस्फूर्तीने आपल्या दुकानांचे समोरील बांधकाम स्वखर्चाने काढून बाजार पेठ रुंदीकरणास आरंभ केला.या विकासात्मक भूमिका घेतलेल्या व्यापारी मित्रांचा सत्कार व जन्मभूमीस कर्तव्यभूमी मानून मानवता, सामाजिकबांधिलकीतून ग्रामीण जनतेस वैद्यकीय सेवा देत आहेत. कोविड काळात न डगमगता काम करताहेत त्यांच्या या योगदानाबद्दल डॉक्टरमित्रांचा गौरव व शिक्षक असा संयुक्त कार्यक्रम वाचन मंदिर मध्ये पार पडला. आरंभ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ.अरविंद मांजरेकर यांच्या शुभ-हस्ते व दीपप्रज्वलन TV9चे चिफ ब्यूरो मा.संदीप राजगोळकर व मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. ग्रंथालयाचे विद्यमान अध्यक्ष मा. अजितसिंह शिंदे-नेसरीकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.

प्रास्ताविक कार्यवाह वसंत पाटील यांनी केले. TV-9 चे चिफ ब्यूरो संदीप राजगोळकर यांचा सत्कार मा. अध्यक्षांनी शाल व ग्रंथभेट देवून केला. उपस्थित सर्व डॉक्टर, व्यापारीमित्र यांचा सत्कार तसेच वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रमुख अतिथी डॉ. मांजरेकरसो, सौ मृणालिनी मांजरेकर, शहिद मेजर सत्यजित शिंदे यांच्या वीरमाता संयोगिता शिंदे,संदीप राजगोळकर, प्रा. राजगोळकर, पत्रकार मानेसर, रविंद्र हिडदुगी, कवि राजाभाऊ आळवी, रामभाऊ पाटील धों. आ. पाटील गुरुजी.म्हमुलाल नुलकर तसेच संचालक डॉ.प्रा.एस्.डी पाटील शशीकांत देसाई शिवाजी पाटील चंद्रकात वनकुद्रे विठ्ठल नाईक टी. बी. कांबळे डॉ. सत्यजित देसाई आपासो कुंभार डॉ. श्रीमती बिस्वास व्यंकोजी शिंदे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मा. संदीप राजगोळकर, डॉ. टी. एच्. पाटील, डॉ. सत्यजित देसाई प्रमुख अतिथी डॉ. मांजरेकरसो तसेच उपाध्यक्ष डॉ. प्रा. एस्. डी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. पत्रकार रविंद्र हिडदुगी यांनी आभार मानले. संजय प्केसरकर गुरुजी सेवानिवृत्त कर्मचारी विचार मंचचे उपाध्यक्ष मारुतीराव रेडेकर इ. मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक श्री. टी. बी. कांबळे यांनी केले. स्पर्धांचे परिक्षण संचालिका सौ जयश्री वळगडे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथपाल सौ.शितल शिंदे, सौ. माधुरी कुंभार यांनी केले. यासाठी बाल वाचकांचेही सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks