राजे समरजितसिंह घाटगे यांच्या 39 व्या वाढदिवसा निमित्य विविध उपक्रम; वह्यांच्या स्वरूपात स्वीकारणार वाढदिवसाच्या शुभेच्छा : वाढदिवस गौरव समितीची माहिती

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांचा उद्या 39 वा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न होत आहे. या वाढदिवसाच्या शुभेच्छा पारंपारिक हार बुके ऐवजी वह्यांच्या स्वरुपात स्वीकारणार आहेत. अशी माहिती वाढदिवस गौरव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत गिजवणे ता. गडहिंग्लज येथील शुभम बँक्वेट हॉल येथे ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. तर सायंकाळी चार वाजल्यापासून श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन येथील प्रधान कार्यालय येथे ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
सकाळी 11 वाजता राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक व लायन्स नॅब मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत डोळे तपासणी शिबिर श्री राम मंदिर येथे व सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन येथे होणार आहे.
ग्रामीण रुग्णालय कागल यांच्या सहकार्याने कोरोना प्रतिबंधक कोवीशील्ड दुसऱ्या मात्रेचे लसीकरण शिबिरही सायंकाळी चार वाजल्यापासून याच ठिकाणी होणार आहे. अशीही माहिती वाढदिवस गौरव समितीच्यावतीने दिली आहे.