गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र
वरद खूण प्रकरण : तणावपूर्ण वातावरणात सोनाळीत वरदचे रक्षाविसर्जन ;संशयित मारुती वैद्यच्या कुटुंबावर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी (ता. कागल) येथील खून झालेल्या वरद पाटील या बालकाचा रक्षाविसर्जन विधी सोमवारी तणावपूर्ण वातावरणात पार पडला. शोकसभेत अनेकांनी या घटनेचा निषेध करत आरोपीला फाशीचीच शिक्षा मिळावी, अशी मागणी केली. घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण गावात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
संशयिताचे पाणी, वीज कनेक्शन तोडले
संशयित मारुती वैद्यच्या कुटुंबावर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला असून ग्रामपंचायतीने आज त्याच्या घरचे पाणी व वीज कनेक्शन तोडले. त्याच्या अकरा जनावरांना पाहुण्यांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी पंचक्रोशीतील गावच्या पोलिस पाटील व सरपंच यांची बैठक घेऊन शांतता व सलोखा राखण्याचे आवाहन केले.