बहिरेश्वर उपसरपंचपदी कृष्णात महादेव सुतार यांची बिनविरोध निवड

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कृष्णात महादेव सुतार यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षस्थानी गावचे सरपंच युवराज दिंडे होते.
बहिरेश्वर गावच्या ग्रामपंचायती मध्ये कुंभी कासारीचे माजी संचालक सिताराम पाटील माजी सरपंच सुर्यकांत दिंडे व भगवान दिंडे या तीन गटांची एकहाती सत्ता आहे . सरपंच पद हे भगवान दिंडे यांच्या गटाकडे आहे तर उपसरपंच पद हे सूर्यकांत दिंडे यांच्याकडे आहे. या पदासाठी रोटेशन पद्धतीने कृष्णात सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत ने इथून पुढील कार्यकाल स्वच्छ व सुंदर करावा तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा कोणती मदत निधी हवा असल्यास तो देऊ असे जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांनी सांगितले पी आर पाटील यांनी फक्त पद, प्रतिष्ठा ही केवळ पाच वर्षाकरिता असते याबरोबर आपला घर प्रपंच ही सांभाळून गावाचा कारभार करावा असे सांगितले..याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, सूर्यकांत दिंडे , पी आर पाटील भगवान दिंडे, रघुनाथ वरुटे, तंटामुक्त अध्यक्ष मारुती दिंडे , पांडुरंग दिंडे, बाबासो हवलदार हंबीराव चौगलेआदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य प्रा.तानाजी गोदडे यांनी केले तर आभार ग्रामसेवक बी एस कांबळे यांनी मानले.