ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगुड उपनगराध्यक्षपदी रंजना मंडलिक यांची बिनविरोध निवड

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ रंजना दत्तात्रय मंडलिक यांची बिनविरोध निवड करणेत आली.सौ. रेखाताई मांगले यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्‍या पदाची निवड करणेसाठी पिठासीन अधिकारी मा. राजेखान जमादार यांचे अध्‍यक्षतेखाली नुतन उपनगराध्‍यक्ष्‍ा निवड पार पडली. रिक्‍त पदासाठी नगरसेविका सौ. रंजना दत्तात्रय मंडलिक यांचा एकमेव अर्ज आल्‍याने या पदाची निवड बिनविरोध करणेत आली. सौ. मंडलिक यांच्‍या अर्जासाठी सुचक म्‍हणून संदीप बाबुराव कलकुटकी व अनुमोदक म्‍हणून श्री नामदेव तुकाराम मेंडके हे होते. कोरोना रोगाच्‍या पार्श्‍वभुमीवर व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे विशेष सभा आयोजित करणेत आली होती. उपनगराध्‍यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्‍याने पिठासीन अधिकारी श्री राजेखान जमादार यांनी सौ. रंजना मंडलिक यांची बिनविरोध निवड केली. या निवडी प्रसंगी नुतन उपनगराध्‍यक्ष यांनी खासदार संजयदादा मंडलिक, मा. विरेंद्रसिंह मंडलिक, नगराध्‍यक्ष राजेखान जमादार व सर्व सहका-यांनी माझयावर जी जबाबदारी टाकली आहे त्‍या विश्‍वासास पात्र राहुन मुरगूड शहराच्‍या विकासासाठी, आरोग्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची ग्‍वाही दिली. यावेळी ऑनलाईन पध्‍दतीने मा. नगराध्‍यक्ष, श्री. जयसिंग भोसले, माजी उपनगराध्‍यक्षा सौ. हेमलता लोकरे , श्री मारुती कांबळे यांनी मनोगते व्‍यक्‍त केली. या सभेसाठी सर्व नगरसेवक, नगरसेविका ऑनलाईन उपस्थित होते. या निवडीचे प्रशासकीय कामकाज मुख्‍याधिकारी हेमंत निकम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks