विद्या मंदिर मिणचे खुर्द शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मनिषा नलवडे व उपाध्यक्षपदी सागर कुंभार यांची बिनविरोध निवड

कुर :
मिणचेखुर्द( ता-भुदरगड)येथील केंद्र शाळा विद्या मंदिर मिणचे खुर्दच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ.मनिषा सचिन नलवडे यांची तर उपाध्यक्षपदी सागर तुकाराम कुंभार, बसरेवाडीकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली या सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव खोपडे होते.
२३/१०/२०२१रोजी सर्व पालकांच्या मताने नुतन शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड एकमताने करण्यात आली होती, त्यामध्ये आताचे नुतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच शिक्षणतंज्ञ प्रतिनिधी म्हणून जेष्ठ नेते आर.व्ही.देसाई सर तर शाळा व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून जिल्हा मंजूर संस्थेचे चेअरमन प्रविणराव नलवडे , ग्रामपंचायत प्रतिनिधी म्हणून उपसरपंच प्रा .आर डी.देसाईसर, नुतन सदस्य सुरेश नाना कांबळे,सागर मारुती देसाईं, युवराज शिवाजी पसारे, वंदना अशोक देसाई, माधुरी सदाशिव आडके,सविता दशरथ नलवडे, यांची तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कुं.वेदिका धनाजी देसाई व रुद्रनिल कासार याची सर्वानुमते निवड करण्यात आली होती .
आज शनिवार दिनांक ४ डिसेबर रोजी केंद्र शाळा विद्या मंदिर मिणचे खुर्द येथे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड करण्यासाठी सर्व नवनिर्वाचित सदस्यांची सभा बोलवण्यात आली होती त्यामध्ये मनिषा नलवडे आणि सागर कुंभार याची सर्वानुमते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी निवड सभेला सर्व सदस्य,शाळेचे अध्यापक हिंदूराव खाडेसर, अध्यापिका सौ.खोपडे मॅडम,सौ.देसाई मॅडम उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक आणि आभार अध्यापक किशोर कासार सर यांनी मानले.