ताज्या बातम्यामनोरंजन
श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय, आडोली शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केल्या अनोख्या गणेशमूर्ती.

राधानगरी :
राधानगरी अभयारण्यातील दुर्गम भागात असणाऱ्या आडोली येथील श्री. महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात गणेश उत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये देवी-देवतांच्या आरत्या पाठांतर करणे तसेच गणेश मूर्तींची निर्मिती करणे असे उपक्रम पार पडले.
इयत्ता पाचवीच्या अनेक विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती तयार केल्या .
सर्व मुर्त्यांचे परीक्षण मुख्याध्यापक व्ही.पी.पाटील सर आणि सहाय्यक शिक्षक के टी.कुंभार सर यांनी केले.
इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या कुमारी आदिती एकनाथ केसरकर, राधिका सुतार, स्वप्न सुंदर पोवार ,दुर्वा शिर्के सह अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सर्व विद्यार्थ्यांना कलाशिक्षक सतीश कुंभार सर यांचे मार्गदर्शन लाभले.