बेलेवाडी मासामध्ये मारामारीत दोघे जखमी ; परस्परविरोधात मुरगूड पोलिसांत तक्रार दाखल

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
बेलेवाडी मासा (ता. कागल) येथे रविवारी नातेवाईकांमध्ये झालेल्या मारामारीत दोघे जखमी झाले. मुरगूड पोलिसांत परस्पराविरोधात फिर्याद नोंदवली आहे. किरण शंकर किल्लेदार आणि दत्तात्रय लक्ष्मण किल्लेदार यांच्यात वाद आहे. त्यांनी एकमेकांविरोधात मारहाण केल्याची फिर्याद नोंदवली. किरण किल्लेदार यांच्या फिर्यादीनुसार जळण घेऊन घरी परतणाऱ्या आईला शिवीगाळ करून दत्तात्रय किल्लेदार याने काठीने मारहाण केल्याची तक्रार नोंदवली आहे. तर दत्तात्रय किल्लेदार यांनी किरण शंकर किल्लेदार, हिंदुराव कृष्णा किल्लेदार आणि इंदुबाई शंकर किल्लेदार या तिघांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. आपली पत्नी भात मळणीचे पिंजर वाळत घालत असताना गैरसमजातून इंदूबाई किल्लेदार यांच्यासह तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल देसाई व शिंदे करीत आहेत.