ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बारावी परिक्षेस आजपासून प्रारंभ ; दोन वर्षांनी ऑफलाईन परिक्षा

Web Team Online :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला सुरुवात होणार आहे. कोरोना महामारीनंतर ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने राज्यभरात घेली जात आहे. या परीक्षेसाठी राज्यात एकूण १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

या राज्यात मुख्य आणि उपकेंद्र मिळून एकूण ९६३५ परीक्षा केंद्र(Examination Center) असतील. उद्या पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असणार आहे. यावर्षी खास पेपर लिहताना ऑनलाईन शिक्षणामुळे लिखाणाचा सराव नसल्याने यावर्षी ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिट तर ४० ते ६० गुणांसाठी १५ मिनिटे वाढवून देण्यात आली आहे. उद्यापासून सुरू होणारी बारावी बोर्ड परीक्षा ७ एप्रिलपर्यंत आहे. परीक्षेच्या आयोजनासंदर्भात बोर्डाकडून तयारी पूर्ण झाली आहे.

परीक्षा(Examination) देण्यासाठी एका हॉलमध्ये २५ विद्यार्थी झिगझॅक पद्धतीने परीक्षेला बसतील. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक तयार करत असताना परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या बहुतांश विषयांच्या पेपरमध्ये खंड ठेवण्यात आला आहे. परीक्षा काळातील संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात भरारी पथके नेमण्यात आली आहेत याशिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या असून विशेष महिला भरारी पथक व काही विभागीय मंडळात विशेष मुख्य अधिकारी यांना परीक्षा केंद्रांना भेटी देण्याबाबत मंडळाकडून विनंती करण्यात आली आहे. कोव्हीड १९ विषाणूच्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना निर्माण झालेल्या अडचणी लक्षात घेता ऑफलाईन पद्धतीने आयोजित परीक्षांसाठी काही महत्त्वाचे उपाय योजना करण्यात आलेले आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks