ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र
शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे निधन

शेगाव :
श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांचे आज(बुधवार) दुपारी 5 वाजता निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने शेगाव येथे निधन . तर, करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये भाविकांनी गर्दी करू नये, असं आवाहन संस्थानच्यावतीने करण्यात आलेलं आहे.
मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली उपाचार सुरू होते.
तसेच, त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे व मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, असं कळवण्यात आलेलं आहे.