शिंदेवाडीत स्व. विक्रमसिंह घाटगे यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाडी (ता. कागल) येथे स्व. विक्रमसिंह घाटगे यांना ७७ व्या जयंतीनिमित्त ग्रामस्थ व कार्यकर्त्यांतर्फे अभिवादन करण्यात आले. माजी सरपंच व बिद्री साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व राजे बँकेचे संचालक दत्तात्रय खराडे यांच्याहस्ते स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. अध्यक्षस्थानी शाहू कृषी उद्योग संघाचे संचालक रामचंद्र खराडे होते.
यावेळी स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या आठवणीना उजाळ दत्तामामा खराडे व रामभाऊ खराडे यांनी आपल्या भाषणातून देत आदराजंली वाहली.
सरपिराजीराव गूळ उत्पादक सोसायटीमध्ये स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या फोटोंचे पूजन आनंदा जाधव यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमास दगडू माळी, विष्णू मोरबाळे, बळीराम शिंदे, रमेश माळी, बबन वंदरे, महादेव खराडे, आबासो खराडे, एकनाथ शिंदे, गुंडू पाटील, गोरखनाथ सावंत, तानाजी खराडे, गजानन खराडे, धनाजी शिंदे, निवृत्ती शिंदे, कृष्णात शिंदे, विठ्ठल सावंत, वसंत वंदुरे, विष्णू वंदुरे, शिवाजी शिंदे, बाळासो मोरबाळे, आनंदा मांगोरे आदिसह श्रीराम दूध संस्था व सेवा संस्थेचे कर्मचारी, ग्रामस्थ हजर होते.
चंद्रकांत खराडे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रकांत आंगज यांनी आभार मानले.