स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना दहाव्या स्मृती दिनानिमित्त शाहू कारखाना कार्यस्थळावर अभिवादन ; विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेतकऱ्यांची दिवसभर रीघ

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शाहू साखर कारखान्याचे संस्थापक,सहकारातील जाणते नेतृत्व, सहकार महर्षि स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांना दहाव्या स्मृती दिनानिमित्त येथे श्री.छत्रपती शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर अभिवादन केले.कारखाना प्रधान कार्यालयाच्या प्रांगणातील स्व.राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या पुतळ्याचे पूजन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे व कागल संस्थानाचे भूतपूर्व अधिपती श्रीमंत जयसिंगराव घाटगे तथा बाळ महाराज यांच्या प्रतिमेचेही पूजन केले.दिवसभरात स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी राजकीय,सामाजिक,कला, क्रीडा,कृषी,सहकार अशा विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शेतकऱ्यांनी रिघ लावली होती.
यावेळी कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील,सर्व संचालक,संचालिका रेखा पाटील,सौ.सुजाता तोरस्कर,शाहू ग्रूपमधील विविध संस्थांचे पदाधिकारी,सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.