प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून युवकांनी केले वृक्षारोपण; गारगोटी हायस्कुल, गारगोटी च्या २०१० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम.

गारगोटी प्रतिनिधी :
गारगोटी हायस्कुल, गारगोटी च्या २०१० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व जपत ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर कलनाकवाडी (ता. भुदरगड) या ठिकाणी वृक्षारोपण केले.
संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग मांडला आहे,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
पक्षीही सुस्वरे। आळविती।।
येणे सुख रुचे एकांताचा वास।
नाही गुणदोष। अंगी येत।।

या संत तुकारामांच्या ओळी सार्थ ठरवत “GHG 2010” या व्हाट्सअप ग्रुप वर एक सामाजिक संदेश पाठवून सर्वांनी एकत्र येण्याचे ठरलं. आणि २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कलनाकवाडी (ता. भुदरगड) या ठिकाणी वृक्षारोपण करण्याचे ठरले व ही सर्व मित्र मंडळी एकत्र आली.
वृक्षारोपण झाल्यानंतर सर्वांच्या चेहर्यावर कार्य सिद्धीस गेल्याची भावमुद्रा पहावयास मिळत होती.
वृक्षारोपण प्रसंगी अभिषेक ढेंगे, विजय खोत, ओमकार पाटील, विशाल तेलंग, राजवर्धन देशमुख, विराज निंबाळकर, ऋतुराज निंबाळकर, अवधूत पाटील, पृथ्वीराज भोसले, अक्षय पाटील, अनिकेत मोहिते, अक्षय डेळेकर, विजय शिंदे, पवन गिरी, अक्षय कबुरे, अवधूत पाटील, सूरज संकपाळ, प्रदीप वडर, मंगेश कोरे आदी मित्रपरिवार उपस्थित होता.