ताज्या बातम्यामहाराष्ट्र
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त क्रांतिगुरू लहुजी साळवे प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने आशा वर्कर (आशा सेविका) , व क्रांतीगुरु लहुजी (वस्ताद) साळवे प्रतिष्ठान यांच्या हस्ते शिवाजी पेठेतील दत्ताजीराव माने विद्यालय ८ नंबर शाळा येथे प्रतिमापूजन,व वृक्षारोपण करण्यात आले.
अँड दत्ताजीराव कवाळे ,अँड प्रमोद दाभाडे, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अक्षय साळवे, गजानन कुरणे, चंद्रकांत काळे, अशा सेविका अनिता कांबळे, सुप्रिया कांबळे ,मंगल बनसोडे, रुपाली जाधव, सारिका कांबळे, लता सासणे,गौरी मोहिते, निकिता चव्हाण ,मनीषा चव्हाण व आशा सेविका उपस्थित होत्या.