ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरीच्या नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी आबा गाढवे रुजू

हंदेवाडी/पुंडलीक सुतार
नेसरी ता.गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी आबा लाला गाढवे हे नुकतेच रुजू झाले असून त्यांचे मुळगाव मेरगळवाडी ता.दौंड हे असून यापूर्वी त्यांनी इचलकरंजी पोलीस ठाणेकडे स.पो.नि.म्हणून २३ महिने काम पाहिले तर आतापर्यंत १७ वर्ष इतकी सेवा झाली असून यापूर्वी अत्यंत उत्कृष्ठ पद्धतीने पोलीस खात्यात सेवा बजावली आहे.
नेसरी परिसरातील सर्वांनी कायदा ,सुव्यवस्था राखणेसाठी सहकार्य करावे असे यावेळी आमचे प्रतिनिधी पुंडलीक सुतार यांचेशी सत्कारादरम्यान बोलताना आपले मत व्यक्त केले.यावेळी प्रतिनिधी पुंडलीक सुतार व विंजने चे माजी सरपंच चंद्रकांत शिवणगेकर यांनी सत्कार केला.