तरसंबळेत शिवरात्री उत्सवा निमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन

तरसंबळे प्रतिनिधी : शाम चौगले
सालाबाद प्रमाणे तरसंबळे (ता. राधानगरी) येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. या निमित्य उत्सव कमिटी कडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
दिनांक २८ फेब्रुवारी ते २ मार्च पर्यंत हा सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. त्यामध्ये स्वयंभू पिंडी पूजन, शिवलीलामृत ग्रंथ पारायण, अभिषेक, किर्तन, त्याच बरोबर २ मार्च रोजी महाप्रसाद होणार असून सायंकाळी ९.०० वा. बुजवडे (ता. राधानगरी)येथील विठ्ठल प्रासारिक सोंगी भजनी मंडळ यांचा कार्यक्रम होणार आहे.
हा उत्सव पार पाडण्यासाठी उत्सव कमिटी, ग्रामस्थ, सर्व दूध संस्था, सेवा संस्था, सर्व तरुण मंडळे, महिला बचत गट, महिलावर्ग विशेष परिश्रम घेणार आहेत.तरी या कार्यक्रमांचा लाभ पंचक्रोशीतील भावी भक्तांना घ्यावा असे आवाहन यात्रा उत्सव कमिटी कडून करण्यात आले आहे.