मुरगूडच्या श्री . व्यापारी नागरी पतसंस्थेच्या वतीने शालेय साहित्य , खाऊ वाटप

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता . कागल येथिल रौप्यमहोत्सवी श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत ” रौप्य महोत्सव ” कार्यक्रमांर्तगत राधानगरी तालुक्यातील कोते येथिल महाराष्ट्र शासनाची आदिवासी विकास विभागामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगांव अंतर्गत कोते आश्रमशाळेच्या अनाथ , निराधार आणि वाडया वस्तीतील गोरगरीब विद्यार्थी -विद्यार्थिनीना त्यांच्या दैनदिन उपयोगी साहित्य आणि शालेय वस्तूंचे वाटप संस्थेमार्फत करण्यात आले .
या शासकीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दराडे यांच्याशी संपर्क साधून संस्थेने १७ मार्च २०२५ रोजी येथिल मुलानां शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता .
या आश्रम शाळेत ९६ विद्यार्थी -विद्यार्थिनीं असून यामध्ये ५० विद्यार्थी , विद्यार्थिनी निराधार आहेत .या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते तर शाळेमध्ये २६ शिक्षक -शिक्षिका विद्यार्थाना शिक्षण देत कार्यरत आहेत असे मुख्याध्यापक दराडे यानीं यावेळी सांगितले .
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन किरण गवाणकर यानी आपल्या मनोगतात संस्थेचा उद्देश सांगून संस्थेमार्फत अशा गरजू विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य करुन संस्था सामाजिक बांधिलकी जपत असलयाचे सांगितले .यावेळी संचालक किशोर पोतदार यानी संस्था स्थापनेपासून श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था ही यशस्वी वाटचाल करत प्रगतीपथावर असलयाचे सांगितले .
या कार्यक्रम प्रसंगी व्हा . चेअरमन प्रकाश सणगर, संचालक नामदेवराव पाटील, प्रशांत शहा , साताप्पा पाटील, शशिकांत दरेकर , धोंडिबा मकानदार , निवास कदम , संदिप कांबळे , संचालिका सौ . रोहिणी तांबट , सौ . सुनंदा जाधव ,कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर यांच्यासह शिक्षक , शिक्षिका , शालेय कर्मचारी , विद्यार्थी , विद्यार्थिनीं उपस्थित होते .