ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
‘चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा दावा दाखल करणार’

मुंबई प्रतिनिधी :
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पत्र लिहिले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये हे पत्र जसेच्या तसे छापले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना पुढील चार दिवसांत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला आहे. लोक ५० कोटी, १०० कोटींचा दावा दाखल करतात. मी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सामनात अग्रलेख आला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पत्र लिहित उत्तर दिलं होतं.