मुरगुड विद्यालयाचे तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत ; पाचवीचे आठ तर आठवीचे सहा विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत ;कागल तालुक्यात आठवीत प्रथम तर पाचवीत दुसरा क्रमांक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड मधील पाचवीचे तीन विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले आहेत. जिल्हा गुणवत्ता यादीत पाचवीचे आठ तर आठवीचे सहा विद्यार्थी आले आहेत. कागल तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत आठवीत प्रथम तर पाचवीत दुसरा क्रमांक मिळवला आहे. यामुळे विद्यार्थी पालक शिक्षक वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
इयत्ता पाचवी चे यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे
आदित्य शंकर पाटील- राज्यात 8 वा
अंकिता कृष्णा सुतार- राज्यात 10 वी
अनुज दीपक मेंडके- राज्यात 11 वा
कार्तिक विलास अनुसे-जिल्ह्यात 35 वा
तनिष्का आनंदा पेडणेकर- जिल्ह्यात 78 वी
निखिल सचिन चौगुले-जिल्ह्यात 90 वा
धैर्यशील मारुती पारळे- जिल्ह्यात 156 वा
समर्थ धोंडीराम सूर्यवंशी- जिल्ह्यात 165 वा
इयत्ता आठवी चे यशस्वी विद्यार्थी खालील प्रमाणे
जागृती एकनाथ बागडे- जिल्ह्यात 25 वी
प्रतिकराव राजेश खराडे- जिल्ह्यात 39 वा
दिव्या विजयकुमार गुरव- जिल्ह्यात 50 वी
उत्कर्षा यशवंत मुसाई- जिल्ह्यात 59 वी
सृष्टी संदीप पाटील जिल्ह्यात- 68 वी
रणवीर सागर मडीलगेकर- जिल्ह्यात 191 वा
पाचवीच्या विद्यार्थ्यांना श्री.व्ही. एस. पाटील, सौ.व्ही. एस.सूर्यवंशी-पाटील,
सौ.एस.आर.भोई, सौ.जी.व्ही.पाटील, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना श्री.एम.बी.टेपूगडे
सौ.बी.वाय.मुसाई सौ.एस.जे गावडे
सौ.के.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तर शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई,अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, चेअरमन सौ. लिना सावंत, पेट्रन कौन्सिल मेंबर युवा नेतृत्व दौलत देसाई, ,प्रशासनाधिकारी मंजिरी देसाई मोरे, शिक्षक प्रतिनिधी बाळ डेळेकर, प्राचार्य एस. आर. पाटील, उपप्राचार्य एस. पी. पाटील, उप मुख्याध्यापक आर. जी. देशमाने, सुपरवायझर एस. वाय. बेलेकर यांचे प्रोत्साहन लाभले.