वेदगंगेत फक्त कर्ज देणारी माणसं नाहीत तर जीवाला जीव लावणारी माणसं आहेत : जेष्ठ पत्रकार सुभाष धुमे

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पोटाची खळगी भरण्यासाठी गावा गावातून आलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी त्यांच्या आडी-अडचणीनी सोडविण्यासाठी फक्त कर्ज देणारी वेदगंगा संस्थेत माणसं नाहीत तर प्रत्येक माणसाला जीव लावणारी आपलंस करणारी खरी-खुरी माणसं असल्याचे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार लेखक सुभाष धुमे यांनी केले.
ते वेदगंगा मल्टिपर्पज को ऑप सोसायटी ली मुरगूड च्या 5व्या वर्धापन दिन तसेच ATM सुविधा लोकार्पण सोहळा कार्यक्रमात उदघाटन प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वेदगंगा सोसायटी चे चेअरमन डॉ. मोहन गोखले होते.
यावेळी गावाकडच्या गोष्टी, गावाकडची माणसं, राजकारण, तरुण, सहकार क्षेत्रावर भाष्य करत राजकीय क्षेत्रातील लोकांवर आपल्या अमोघआणि धारदार वाणीतून चिमटे काढताचं उपस्थितांनी उस्फूर्त टाळ्यांची दाद दिली.
यावेळी बोलताना पुढे म्हणाले की, आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या सोबत नाही तर जिथं आपल्या घामाची कदर होते स्वप्नांची स्वप्नपूर्ती होते त्याचं माणसा सोबत भक्कम उभे रहा हिचं माणसं येणाऱ्या आपल्या काळात आधारवड होतील असे तरुणाईला आवाहन करत गावाकडील वेदगंगा नदी आणि पंचक्रोशीतली वेदगंगा पतसंस्था दोन्ही सारख्याचं एक ग शेतकऱ्यांची काळी माती हिरवीगार करते शेतकऱ्यांचं नंदनवणं करते तर मुरगूड मधील वेदगंगा सर्व सामान्य माणसांचा आधार बनून त्यांची स्वप्न पूर्ण करते ही वेदगंगा आपली असल्याचे गौरवोद्वार सुभाष धुमे यांनी काढत वेदगंगे च्या शेकडो शाखा भविष्यात
व्हाव्यात ATM सुविधेमुळे अनेकांना व्यवहार करणे सोईचे होईल अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरवात मान्यवारांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आली ATM सुविधा उदघाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती मा प्रा अर्जुन कुंभार सर, RTO अधिकारी प्रिया सूर्यवंशी पाटील मॅडम, मा साताप्पा कांबळे, बँक ऑफ इंडिया मुरगूड शाखाधिकारी श्री अमित गायकवाड साहेब, युनियन बँकेचे शाखाधिकारी नीरज कांबळेसो यांचीही मनोगते झाले दरम्याने मान्यवरानी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.प्रमुख मान्यवरांचा गौरव शाल ट्रॉफी देऊन करण्यात आला
यावेळी वेदगंगा सोसायटीचे चेअरमन डॉ मोहन गोखले व्हा चेअरमन रावसाहेब कांबळे कार्यकारी संचालिका राजश्री मधाळे मॅनेजर प्रिया गोखले, सुप्रिया हसबे नीलम प्रधान आदि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक कल्याणी अधिकारी यांनी केले तर आभार सुप्रिया हसबे यांनी मानले.