ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूड परिसरात चोरीचे सत्र सुरूच ; मुरगूडमध्ये चार, तर सोनगेमध्ये एक घर फोडले

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

गेल्या काही दिवसापासून मुरगूड शहर आणि परिसरामधील विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडत आहेत.चोरटे बंद घरांना लक्ष्य करून किंवा त्यांच्यावरती टेहाळणी करून तीच घरे फोडत आहेत.मुरगुड परिसरामध्ये चोरट्यांनी काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुरगूड येथील महालक्ष्मी कॉलनी व माधवनगर परिसरातील बंद असणारी चार घरे चोरट्यांनी फोडली, तर सोनगे येथेही बंद घरामध्ये चोरी झाली. या ठिकाणाहून तीन ते चार लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.

मुरगूड माधवनगर येथील सेवानिवृत्त शिक्षिका यशोदा सूर्यवंशी यांच्या बंद घरामधील बेडरूम मधील खिडकीचे गज वाकवून चोरट्याने प्रवेश केला. येथील सर्व तिजोऱ्या फोडून त्यातील साहित्य अस्ताव्यस्त टाकून पन्नास ते साठ हजार रुपये रोख, तर दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. महालक्ष्मी कॉलनी येथील प्रवीण पांडुरंग पाटील, पारुबाई दत्तात्रय केसरकर, जोतिराम नामदेव बोंडगे यांच्या घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला.

किरकोळ रक्कम वगळता चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. सोनगे येथील नीलेश नारायण ढोले यांचे बंद घर चोरट्याने फोडून त्यांच्याही घरातील तिजोरीतील रोख रक्कम पन्नास हजार रुपये चोरट्याने लंपास केली. या सर्व चोरीच्या प्रकारामुळे मुरगूड पोलिसासमोर आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks