ताज्या बातम्यामहाराष्ट्र
यमगे येथील किराणा दुकानात चोरी. छत्तीस हजार च्या मालावर चोरट्याचा डल्ला.

मुरगुड प्रतिनिधी :
यमगे (ता .कागल) येथील किराणा दुकानात ९ जुलै ला रात्री एका अज्ञात चोरट्याने छत्तीस हजारांच्या मालावर डल्ला मारला .
फिर्यादी इंद्रजित घाटगे यांचे ‘जी’ मार्ट नावाचे यमगे येथे किराणा दुकान असून या दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा उचकटून चोरट्याने रात्री नऊच्या सुमारास दावत तांदूळ ,गूळ,साखर,खोबरेल तेल ,मसाले इत्यादी जीवनाशक वस्तूंची चोरी केली .
याशिवाय शेजारी शामराव ढेरे यांच्या श्रद्धा कोल्ड्रिंक हौस या दुकानातील एक हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली.तसेच विजय महादेव भोसले यांच्या घरात ही चोरीचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले .
मुरगुड पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक दीपक मोरे या घटनेचा अधिक तपास करत आहेत .दरम्यान या प्रकारामुळे गावात भितीचे वातावरण तयार झाले आहे .