तरुण पिढीला आजही संताच्या विचारांची गरज: ह.भ.प. विठठल महाराज गावडे

चंदगड :पुंडलिक सुतार
संत ज्ञानेश्वर, जगतगुरू तुकाराम महाराज,संत चोखामेळा, संत जनाबाई,संत मीराबाई अश्या अनेक संतानी भागवत संप्रदाया पाया रचला आणि त्याला कळस चढवण्याचे कार्य देखील केले आहे. महाराष्ट्र ही संताची भूमी असुन येथे संताची थोर परंपरा आहे.
सोशल मीडियाच्या युगात विज्ञान कितीही पुढे गेले तरी भागवत संप्रदाय व भगवतगिते शिवाय आपल्याला पर्याय नाही आणि ते विश्वानेही मान्य केले असुन तरूण पिढीने न भरकटता चागंले काय अन वाईट काय याचा विचार वेळीच करून आपले आयुष्य मार्गी लावावे असा उपदेश ह भ प विठठल महाराज गावडे (केरवडे ता चंदगड) यांनी व्यक्त केला.
ते गजरगाव ता आजरा येथिल अखंड हरिनाम सप्ताह सोहळा निम्मित कीर्तना प्रसंगी कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले.सदर सप्ताहाचे आयोजन ह भ प संभाजी पालकर व कुटुंबियांच्या वतीने दरवर्षी करण्यात येते या वर्षी 18 वा अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला आदल्या दिवशी पहाटे आरती,दुपारी हरी भजन,सायंकाळी हरिपाठ,प्रवचन,कीर्तन, रात्री हरिजागर,सकाळी काकड आरती असे कार्यक्रम पार पडले महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली