कसबा बीड गावच्या सरपंचपदी कॉग्रेस कार्यकर्त सर्जेराव तिबीले यांची बिनविरोध निवड

सावरवाडी प्रतिनिधी :
कसबा बीड ( ता . करवीर ) गावच्या सरपंचपदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त सर्जेराव बाबुराव तिबीले यांची बिनविरोध निवड करण्यात आली . ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या व्यापक सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रविण माने होते
यावेळी ग्रामपंचायत माजी सरपंच व सदस्य सत्यजित पाटील , श्रीनिवास पाटील ,दिनकर गावडे उपसरपंच वैशाली सुर्यवंशी , सुनिता मोरे , अनुसया खांडेकर, वैशाली पाटील, जयश्री कांबळे , अजंना कुंभार, सचिन पानारी, पोलीस पाटील , पंढरीनाथ ताशिलदार, तलाठी एन पी पाटील,करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, बाळकृष्ण पाटील जिल्हा मार्केट कमिटीचे माजी उपाध्यक्ष शामराव सुर्यवंशी , भगवान सुर्यवंशी , प्रकाश तिबीले , आत्माराम वरुटे , हिरायत मुल्ला आदि उपस्थितीत होते . प्रारंभी डी एम सुर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले . शेवटी ग्रामसेवक एस बी पाटील यांनी आभार मानले
यावेळी ग्रामस्थ , युवक कार्यकर्त कर्मचारी वर्ग उपस्थितीत होते . ग्रामपंचायतीमध्ये आमदार पीएन पाटील गटाची सत्ता आहे .