सोनारवाडी येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक ह.भ.प.कै. धोंडिबा रामा गावडे यांचे निधन

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
सोनारवाडी ता.चंदगड येथील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक ह.भ.प.श्री.धोंडिबा रामा गावडे वय 83 वर्ष यांचे शुक्रवार दि.7 एप्रिल 2023 रोजी दुःखद निधन झाले .
ह.भ.प.कै. श्री.धोंडिबा रामा गावडे यांचा अल्पपरिचय थोडक्यात – ह.भ.प.धोंडिबा गावडे यांचे शिक्षण जुनी 7 वी पर्यंत झाले होते. त्यांचा स्वभाव साधा,मनमिळावू व प्रेमळ असा होता. ते पंढरीच्या पांडुरंगाचे माघी वारीचे बऱ्याच वर्षांपासून वारकरी होते. धार्मिक व सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असायचा. त्यांच्या अचानक जाण्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती शेवंता, मुले लक्ष्मण, दिनकर सुना सौ. आक्काताई, सौ.वंदना, नातवंडे सौ.स्वप्नाली, कु.निशा, शुभम, कु.अनुष्का,अतुल विवाहित मुलगी सौ.तुळसा निवृत्ती गावडे (येमेहट्टी) व समस्त रामा गावडे असा परिवार आहे.