शाळांचा परिसर आजपासून गजबजणार

कोल्हापूर :
जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व माध्यम, व्यवस्थापनाच्या 3 हजार 715 शाळा शाळा मंगळवार (दि. 25) पासून पुन्हा सुरू होणार आहेत. शाळांची घंटा वाजणार असल्याने परिसर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार 15 फेब—ुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय झाला होता; परंतु पालक, शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर सरकारने निर्णय बदलला आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार 25 जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. यात शासकीय 9, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक 1981, नगरपालिकेच्या 130, खासगी अनुदानित 996, खासगी विनाअनुदानित 599 शाळांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे लसीकरण 10 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करा
दोन्ही लसीकरण पूर्ण झालेले शिक्षक व कर्मचारी शाळेत उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक वर्गात 50 टक्के विद्यार्थी संख्या असणार आहे. एक दिवस आड विद्यार्थ्यांना बोलविले जाणार आहे. वर्गखोल्यांच्या उपलब्धतेप्रमाणे दोन सत्रात भरविण्यात येणार. कंटेन्मेंट झोनमधील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये बंद राहणार आहेत. 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण 10 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याबाबत शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्या आहेत.