ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
आजरा पोलीस ठाणेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाणेत पोलीस पाटील यांना मार्गदर्शक सूचना देणेत आल्या आज प्रशासकिय इमारतीच्या सभागृहात , आजरा पोलीस ठाणे यांच्या वतीने आयोजित आगामी गणेशोत्सव च्या संदर्भात पोलीस पाटील मिटींग पार पडली. स.पो.नि. बालाजी भांगे यांनी कोविड च्या परिस्थितीचे भान ठेवून तसेच शासनाच्या मार्गदर्शिकेनुसार , डॉल्बी व वाद्य विरहित गणेशोत्सव साजरा करणेचे आवाहन केले तसेच एक गाव एक गणपती साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करण्याचे आवाहन केले .यावेळी पो हे कॉ म्हसवेकर,पो हे कॉ देऊस्कर ,गोपनीय पो हे कॉ तराळ यांचेसह 60 पोलीस पाटील उपस्थित होते.