मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई ऑनलाईन :
राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून आता कोरोनाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानात शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. आदित्य यांच्यानंतर आता त्यांच्या मातोश्री आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे वृत्त अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केले आहे. काल रात्री रश्मी ठाकरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, त्या घरीच क्वारेंटाइन झाल्या आहेत.
दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाद्वारे रश्मी ठाकरे यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. दरम्यान, रश्मी ठाकरे या घरीच क्वारंटाइन झाल्या आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना शनिवारी कोरोनाचा संसर्ग झाला होता. आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली होती. त्यानंतर आता रश्मी ठाकरेंनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.