संसर्गाचा वेग वाढला! ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; देशातील रुग्णसंख्या 1,431 वर

NIKAL WEB TEAM :
मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक होताना दिसत आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.
त्यातच आता देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिल्ली दुसऱ्या क्रमाकांवर असून देशातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या 1,431 वर पोहोचली आहे. यापैकी 488 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात आतापर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,431 वर पोहोचली आहे. यातील 488 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात एकूण 454 रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी 167 बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राजधानी दिल्ली आहे. दिल्लीत तब्बल 351 रुग्ण आढळून आले. यापैकी 57 रुग्ण बरे झाले आहेत.