शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांना विनम्र अभिवादन स्मृती दिनाचे औचित्य साधत शाहूच्या रूग्णवाहिका सेवेचा शुभारंभ

कागल, प्रतिनिधी :
येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त शाहू साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .
कारखाना प्रांगणातील त्यांच्या पुतळ्यास कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे,शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व कारखान्याच्या संचालिका श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तत्पुर्वी कारखाना प्रांगणातील राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासही पुष्पहार अर्पण केला.
या स्मृतीदिनाचे औचित्य साधून कारखान्या मार्फतच्या रुग्णवाहिकेची पूजन करून ती आरोग्यसेवेसाठी दाखल करण्यात आली
यावेळी माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर,कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील, व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्व. घाटगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात येणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची खबरदारी घेत हा स्मृतिदिन मोजक्या सभासदांच्या कार्यकर्त्यांनच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा केला.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे सर्व संचालक, राजे बॅंकेचे चेअरमन एम. पी .पाटील,व्हाईस चेअरमन नंदकुमार माळकर, शाहू कृषी संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस, व्हाईस चेअरमन अरुण शिंत्रे, शाहू दूध संघाचे सर्व संचालक,शाहू ग्रुप मधील विविध संस्थाँचे पदाधिकारी व सभासद शेतकरी कर्मचारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शाहूच्या रूग्णवाहिका सेवेचा शुभारंभ
या स्मृतीदिनाचे औचित्य साधून शाहू साखर कारखान्याच्या रुग्णवाहिकेचे चेअरमन श्री. समर्जीतसिंह घाटगे यांच्या शुभहस्ते पूजन करून नागरिकांच्या सेवेसाठी या रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ केला. स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांनी करखाण्यामार्फत विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवण्याचा पायंडा शाहू ग्रुपमध्ये सुरू केला होता. तीच परंपरा पुढे चालवत आज हा उपक्रम सुरू केल्यामुळे सभासदांतून समाधान व्यक्त होत आहे.