विद्यार्थिनींनी सक्षम होण्याची गरज : जयश्री जाधव
कडगाव प्रतिनिधी :
विद्यार्थिनींनी स्वतःला सक्षम बनवावे .चांगला आणि वाईट कळण्याइतके आपण विचार करू शकतो. त्यामुळे आपण स्वतःला आबला न समजता सबला बनून येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्यावे. असे मत कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री जाधव यांनी व्यक्त केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. आर .डी .पोवार होते. कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव येथे आयोजित “विद्यार्थिनी सुरक्षा मार्गदर्शन “शिबिरात त्या बोलत होत्या. जीवनातील अनेक छोट्या मोठ्या अनुभवांच्या आधारे आपण शिकत रहावे ,शिक्षणामुळे आपल्याला आपले अधिकार व कर्तव्य समजतात . येणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण स्वतः सक्षम बनावे. शाळेतील सूचना व तक्रारपेटीचां उपयोग कसा करावा याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक ए .डी .देसाई यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रकांत लिमकर यांनी केले, आभार चंद्रकांत मासाळ यांनी मांडले.