ताज्या बातम्यामहाराष्ट्र

केवळ टक्केवारी म्हणजे यश नव्हे तर क्षमता, कौशल्ये विकसित होणे गरजेचे : गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे; गारगोटी हायस्कूलमध्ये विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न

गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर होते.

गारगोटी प्रतिनिधी :

परीक्षेत मिळणारी टक्केवारी म्हणजे यश नव्हे तर आपल्या क्षमता आणि कौशल्य विकसित होणे गरजेचे असून त्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन भुदरगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले.

गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य मिलिंद पांगिरेकर होते.

इ. १० वी परीक्षेत भुदरगड तालुक्यात प्रथम आलेल्या कु. सायली विक्रम सारंग हिच्यासह गुणवंत विद्यार्थी कु राधिका गुरव, अनिरुद्ध जोशी, रितेश देसाई, आदित्य देसाई, मैथिली सोळसे, विनयराज कोरे, अथर्व बिक्कड, राहुल बोंगार्डे, भूमी गुरव, आर्या राजिगरे, नुपूर पाटील, प्रियानी शिंदे, आयुष सावंत यांचा सत्कार गटशिक्षणाधिकारी श्री.मेंगाणे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पालक प्रतिनिधी भगवान रामचंद्र गुरव, कु आरोही कांबळे, कादंबरी चव्हाण, सेजल मानकर, शंभूराजे दीपक देसाई, केदार पाटील, हुदा काझी, सायली पवार, वेदिका देसाई, समीक्षा सावंत, लावण्या जाधव, राजनंदिनी शिंदे, मेहेक काझी, ईश्वरी पाटील, सिद्धी शेणवी, राजेश्वरी देसाई, कार्तिकी कोदले, कार्तिकी देसाई, सोहम सारंग, शुभम वारके, अवधूत देसाई, वल्लभ पाटील यांची भाषणे झाली.

यावेळी कडगाव हायस्कूलचे प्राचार्य डॉ.आर. डी. पोवार, एच. आर. शिंदे, पालक प्रतिनिधी सौ. रुपाली अजित राजिगरे, एस. एस. नाईक, आर. पी. गव्हाणकर, पी.पी.भंडारी, एस.एम.साळवी, युवराज शिगावकर, बी. के. इंगळे, श्रीमती आर. आर. बहादुरे, सौ. एल.आर.पाळेकर, सौ. सुजाता पाटील, ऋषिकेश गव्हाणकर, श्रीमती मेघा चव्हाण पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक जी डी. ठाकूर यांनी, आभार कु. आयुषी रविराज पाटील हिने तर सूत्रसंचालन कु. लावण्या युवराज पाटील व कु.अंतरा संतोष शिंदे यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks