आरोग्यताज्या बातम्यामहाराष्ट्र
आनंदाधाम सेवाभावी संस्थेचे हेल्थ कार्ड ठरतेय सर्व सामान्य लोकांसाठी आधार; संस्थेचे अध्यक्ष संदीप सरदेसाई यांची माहिती.
ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा नामांकित हॉस्पिटल, मेडीकल मध्ये अल्प दरात उपलब्ध करून दिली जात आहे.

कोल्हापूर प्रतिनिधी :
आजच्या कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी वैद्यकीय सेवा यावर मात करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आनंदाधाम सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य लोकांना वैद्यकीय सेवा सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध होण्याकरिता हेल्थ कार्ड योजना सुरू केली आहे.
यामध्ये स्मार्ट हेल्थ कार्ड नोंदणी शुल्क दोनशे पन्नास रुपये भरून नोंदणी केल्यास ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना वैद्यकीय सेवा नामांकित हॉस्पिटल, मेडीकल मध्ये अल्प दरात उपलब्ध करून दिली जात आहे.
सदर कार्डचा लाभ बहुतांश नागरिकांनी घेतला आहे. तरी सर्व ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी या स्मार्ट हेल्थ कार्ड चा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संदीप सरदेसाई यांनी केले आहे.