नुकसानग्रस्तांना भरीव मदत न दिल्यास फार मोठ्या आक्रोशास सरकारला सामोरे जावे लागेल : समरजितसिंह घाटगे यांचा इशारा

कागल प्रतिनिधी :
अतिवृष्टी व महापुराने शेतकरी नागरिक व्यापाऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या तुलनेत जाहीर केलेली मदत तोकडी आहे. हे फसवे पॅकेज आहे. नुकसान भरपाई वाढवून द्या अन्यथा फार मोठ्या आक्रोशास सरकारला सामोरे जावे लागेल. असा इशारा शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
ते पुढे म्हणाले,
राज्य सरकारने जाहीर केलेले ११ हजार ५००कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज खूपच तोकडे आहे. कारण त्यापैकी दहा हजार कोटी रुपयांची रक्कम दीर्घकालीन उपाययोजनेसाठी जाणार आहे. व फक्त दीड हजार कोटी रुपये तातडीच्या मदतीसाठी
उपलब्ध होणार आहेत .
महापूर वा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी मी जिल्हा दौरा पूर्ण केला आहे.शेतकऱ्यांच्या जमिनी ,पिकासह गुराढोरांचे फार मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे व व्यापाऱ्यांचेही फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मोठ्या आशेने हे सर्व नुकसानधारक शासनाकडे मदतीच्या अपेक्षेत आहेत
या शिवाय शेतकऱ्यांच्या पिकास,जमिनीच्या नुकसानीची भपाई,बाबत कोणताही ठोस शब्द अजून शासनाने दिलेला नाही. नुकसानग्रस्तांची कर्जमाफी वीज बिल वसुली बाबत कोणताही शब्द राज्य शासन काढण्यास तयार नाही. पंचनामे झाल्याशिवाय यावर बोलता येणार नाही असे एकीकडे सांगत आहेत तर दुसरीकडे ते अतिशय संथगतीने सुरू आहेत .केवळ 20 टक्केच पंचनामे झाले आहेत. शेती व पिकांच्या नुकसानीचे तर पंचनाम्यांचा काही ठिकाणी पत्ताच नाही .पंचनामे करत असताना अतिशय कडक निकष लावले जात आहेत व ते चुकीचे पद्धतीने केले जात आहेत. जेणेकरून नुकसान धारकांना मदत मिळण्याऐवजी त्यांना डावलले जाईल. असा छुपा डाव राज्य सरकार करीत आहे. असा घणाघाती आरोपही त्यांनी केला
२०१९ च्या जीआरच्या निकषाप्रमाणे भरपाई द्या
या वेळी श्री. घाटगे यांनी 2019 च्या महापुराच्या वेळी भाजपा सरकारने नुकसान भरपाई बाबत लागू केलेला जीआर हा वस्तुस्थितीला धरून होता. त्यामुळे यावेळी सुद्धा या जीआर प्रमाणेच मदत करण्यासाठी जसाच्या तसा हा जीआर लागू करावा अशीही मागणी केली.