ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“खालिद का शिवाजी ” चित्रपट गडहिंग्लज मधील चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित करू नये : शिवसेना शिंदे गटाची प्रांताधिकारी यांच्या कडे निवेदनातून मागणी

गडहिंग्लज प्रतिनिधी : राजेंद्र यादव

‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट गडहिंग्लज शहरातील चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित करू नये अशी मागणी आज शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गडहिंग्लज नगर परिषदेचे प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली .

खालिद का शिवाजी हा चित्रपट महाराष्ट्रात येत्या काही दिवसातच प्रदर्शित होणार आहे तत्पूर्वी त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवून इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याची प्रतिक्रिया इतिहास संशोधक अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी दिली आहे .

चित्रपट निर्मात्याकडे कोणताही पुरावा नसल्याने महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्ष व हिंदुत्ववादी संघटनांनि याला विरोध केला आहे.त्यामुळे तमाम शिवभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे .त्यामुळे या चित्रपटातील वादग्रस्त असणारी दृश्ये हटवून चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास चांगल्या प्रकारे दाखवून हा सदरचा चित्रपट प्रदर्शित करण्यास काहीच अडचण नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

यावेळी शिवसेना शिंदे गट गडहिंग्लज शहर संघटक काशीनाथ गडकरी,शहर प्रमुख वसंत नाईक, शहर प्रमुख अशोक शिंदे,तालुका प्रमुख संजय संकपाळ ,युवा सेना चंदगड विभाग प्रमुख सुदर्शन बाबर,युवासेना तालुका प्रमुख विलास पाटील,महिला तालुका प्रमुख स्नेहलता बाडकर,लक्ष्म पाचापुरे,मुबारक मुल्ला आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks