
शब्दांकन : व्ही. आर .भोसले (मुरगुड )
पेडर रोड, सिल्व्हर ओक ,
ही तर श्रीमंतांची वस्ती .
इथं या गरीब विधवा आईचं काय काम .तिचं कोण ऐकणार इथं ?
आम्हांला असाच प्रश्न पडला होता .पण या विधवा आईनं इथूनच केलेला हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश साऱ्या महाराष्ट्रानं ऐकला .
गेली पन्नास वर्षे महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक ‘ या निवासस्थाना समोर तीन हा आक्रोश केला .
गेल्या पाच महिन्यापासून आझाद मैदानावर संप करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या कांही मागण्या कोर्टाने मान्य केल्या पण विलीनीकरण हा शासनाचा धोरणात्मक प्रश्न असल्याचे सांगून तो निर्णय शासनावर सोडला .
..
का मागत होते ते विलीनीकरण ?
जर विलीनीकरण झाले नाही तर सरकार एस टी चं खाजगी करण करणार हे त्यांना माहीत होतं .
सत्तर वर्षे राज्याच्या कानाकोपऱ्यात अविरत धावणारी एस टी तोट्यात आहे असे सांगून सरकार तिचे खाजगीकरण करायला टपलेले होते .
रेल्वेच्या खालोखाल स्थावर मालमत्ता असलेल्या या विशाल महामंडळात एक लाख कर्मचारी आहेत .त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या किमान सहा ते सात लाख कुटुंबियांच्या रोजी रोटीचा प्रश्न होता .
सरकारी शिपायाला सुद्धा ड्रायव्हर कंडक्टर पेक्षा दुप्पट पगार मिळत होता .शिवाय कर्जे ,भत्ते ,क्रेडिट डेबिट कार्डे यांचा तो शिपाई वापर करू शकत होता ,दिवाळी ला उन्हाळ्याला सुट्टीवर जाऊ शकत होता ,
एस टी चा कर्मचारी रात्रंदिवस ‘ ड्युटीवरच असायचा .
दिवाळीचं अभ्यंग स्नान कुठल्या तरी बसस्थानकात ल्या नळावर नाहीतर मुक्कामाच्या खेड्यात एखाद्या विहिरीवर करायचा .
,ना तेल ना साबण .
गाडयावर जाऊन भजी खाणे व वर घोटभर चहा पिणे ,
झाली त्याची दिवाळी.
फराळाचे डबे भरून निघालेल्या भावाला बहिणीकडे पोचवणे . रोजची एकादशी करून वारकऱ्यांना पंढरीला पोचवणे .
घरचं पोर तिथंच टाकून गावाच्या पोर आणि पोरींना शाळेत पोचवणे ,
,,वकिलाला कोर्टात व नर्स ला दवाखान्यात सोडण्यात त्यानं कधि कुचराई केली नाही .
,
त्यानं काय मागितलं ?
पुरेसा पगार व भविष्याची शाश्वती ,.
माजलेल्या सरकारनं सत्तर वर्षे गड्या सारख त्यांना वागवलं .
,पाच वर्षे आमदारकी आणि आयुष्य भर पेन्शन .,शिवाय घरं .
,एस टी त आमदारांनी स्वतःची शिवशाही ही सुरू केली .
हे नुसतं बघत राहिलेल्या कर्मचाऱ्यांना कोणी नेता नव्हता .
मान्यता प्राप्त नावाच्या संघटनेने मंडळाची अक्षरशः वाट लावली .
त्यांनी कुबेराची संपत्ती कमावली आणि एस टी ची पन्नासभर पोरं आत्महत्या करून देवाघरी गेली
अशाच या आईचा ,पत्नीचा ,विधवेचा सिल्व्हर ओक समोरचा आक्रोश महाराष्ट्रानं ऐकला ,सुप्रियांनही ऐकला .परब ने आणि उद्धवने पण ऐकला .
. जे कळायचं ते राज्याला कळलं पण सरकारला कळल नाही.
मता साठी पावसात भिजणाऱ्या शरद पवारांना ही दोन थेंब या मातेसाठी चष्म्यातून खाली सोडावेत असं वाटलं नाही .
हा आक्रोश वाया जाणार नाही एवढीच अपेक्षा .
शब्दांकन : व्ही. आर .भोसले (मुरगुड )