ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

बिद्री कारखान्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारुन पुण्याईचे काम केले; ऑक्सिजन प्रकल्प उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील यांचे गौरवोद्गार

बिद्री प्रतिनिधी : अक्षय घोडके

ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा सक्षम करण्यासाठी जूलै अखेर 11 प्रकल्प कार्यान्वित होत असून त्यातून 27 टन ऑक्सिजनची उपलब्धता होणार आहे.  शासनाच्या आवाहनानुसार बिद्री साखर कारखान्याने ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचे आव्हान पेलले. सहकारी क्षेत्रात जिल्ह्यात सर्वप्रथम ऑक्सिजन प्रकल्प उभारुन बिद्रीने पुण्याईचे काम केले आहे. असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्य मंत्री व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले.

श्री. दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरावजी जाधव होते. प्रारंभी मंत्री पाटील यांच्या हस्ते ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असून खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने संपुर्ण तयारी केली आहे कोरोनाला रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनेत कोल्हापूर जिल्हा पुण्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कमी वेळेत जास्त गाळप करण्याची साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. यामध्ये के. पी. पाटील यांनी उत्तम व्यवस्थापन व सचोटीने कारभार करत दराच्या बाबतीत कायमच आघाडी घेतली आहे. साखर कारखानदारीकडे व्यवसाय म्हणून पाहिले तरच उस उत्पादकांचे हित साधले जाणार आहे. गोकूळच्या माध्यमातून संस्था व दूध उत्पादकांचे हित साधण्यासाठी अँक्शन प्लॅन तयार केला असून साखर कारखान्याचीदेखील त्यासाठी मदत घेतली जाणार आहे.

अध्यक्ष के. पी. पाटील म्हणाले, कोरोना पार्श्वभुमीवर सामाजिक बांधीलकी या नात्याने बिद्री साखर कारखान्याने लाँकडाऊनमधील अनंत अडचणीवर मात करत जिल्ह्यात सर्वात प्रथम ऑक्सिजन प्रकल्प पुर्ण केला. या प्रकल्पातून दररोज 90 सिलेंडरची निर्मिती होणार असून याचा फायदा गरजूंना होणार आहे. सहवीज प्रकल्पाच्या यशानंतर हाती घेतलेले विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरु असून येत्या गळीत हंगामात दैनंदिन आठ हजार मे. टन ऊसाचे गाळप केले जाईल. विस्तारीकरणानंतर बिद्री साखर कारखान पश्चिम महाराष्ट्रात आघाडीवर राहील. कार्यक्रमाचे अध्यक्ष दिनकरराव जाधव यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाला मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या.
 
गोकूळचे संचालक शशिकांत पाटील – चुयेकर यांचा कारखान्याच्या वतिने अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास यावेळी संचालक सर्वश्री ए.वाय.पाटील, बाबासाहेब पाटील, गणपती फराकटे, प्रविणसिंह पाटील, राजेंद्र पाटील, धनाजीराव देसाई, श्रीपती पाटील, धोंडीराम मगदूम, उमेश भोईटे, एकनाथ पाटील, प्रविण भोसले, मधुकर देसाई, के.ना.पाटील, अशोक कांबळे, युवराज वारके, प्रदिप पाटील, जगदीश पाटील, सुनिलराज सुर्यवंशी, विकास पाटील, अर्चना विकास पाटील, निताराणी सुनिल सुर्यवंशी यांच्यासह माजी संचालक विजयसिंह मोरे, पंडीतराव केणे, वसंतराव पाटील, जी. डी. पाटील, बाळासाहेब पाटील, सुनिल कांबळे, दत्ता पाटील- केनवडेकर, विश्वनाथ कुंभार, शामराव देसाई, रघूनाथ कुंभार, विकास पाटील मुदाळ व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन सतिश घोरपडे यांनी तर आभार उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks