गरज पडल्यास नाईट कर्फ्यू लावा; ओमायक्रॉन रोखण्यासाठी केंद्र सरकारचे राज्यांना ५ सल्ले
उत्सवांवर प्रतिबंध आणण्याचा सल्ला राज्यांना आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. पूर्णपणे लसीकरण झाले असल्यास ओमायक्रॉनपासून हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून संरक्षण करते. यामुळे डोअर टू डोअर लसीकरण करण्यात यावे असा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.

NIKAL WEB TEAM :
देशात ओमायक्रॉनचे ३०० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही वेळापूर्वीच हायलेव्हल मिटिंग सुरु झाली आहे. तत्पूर्वी केंद्र सरकारने ओमायक्रॉनवरून राज्य सरकारांनी केलेल्या तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी राज्यांच्या कोणत्या जिल्ह्यात ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत, त्यांचा डबलिंग रेट, क्लस्टरवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
उत्सवांवर प्रतिबंध आणण्याचा सल्ला राज्यांना आणि स्थानिक प्रशासनाला देण्यात आला आहे. पूर्णपणे लसीकरण झाले असल्यास ओमायक्रॉनपासून हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून संरक्षण करते. यामुळे डोअर टू डोअर लसीकरण करण्यात यावे असा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे.
हे पाच सल्ले दिले…
१ – नाईट कर्फ्यू लावा, गर्दीच्या कार्यक्रमांना-ठिकाणांवर निर्बंध लादावेत, खासकरून उत्सव लक्षात घेऊन. कोरोनाचे रुग्ण वाढले तर कंटेनमेंट झोन, बफर झोन तयार करा.
२ – टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवण्यावर विशेष लक्ष द्यावे. आयसीएमआरने आणि आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईननुसार दारा दारात जाऊन रुग्णांचा शोध घेणे आणि आरटीपीसीआर टेस्टची संख्या वाढवावी.
३ – हॉस्पिटलमध्ये बेड, अँम्युलन्स आणि आरोग्य उपकरणे वाढविण्यावर भर द्यावा. ऑक्सिजनचा बफर स्टॉक बनवा. तसेच ३० दिवसांच्या औषधांचा साठा करावा.
४ – लोकांना सतत माहिती दिली जावी. अफवा पसरू नयेत याची काळजी घ्यावी, यासाठी राज्यांनी दररोज माहिती द्यावी.
५ – राज्यांनी १०० टक्के लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावे. सर्व पात्र लोकांना दोन डोस मिळालेत का हे तपासण्यासाठी दारोदारी जाऊन अभियान राबवावे.