ए. डी.पाटील सार्वजनिक वाचनालयाचे काम समाजासाठी आदर्शवत : महमंदयासिन शेख

कुडूत्री प्रतिनिधी :
गुडाळ येथील ए.डी.पाटील सार्वजनिक वाचनालयाने वाचन- संस्कृती चळवळ जपून ठेवली आहे. व त्यांचे समाजासाठीचे कार्य आदर्शवत आहे.असे प्रतिपादन मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्ट दिल्ली वरिष्ठ उपाद्यक्ष महंमदयासिन शेख यांनी वाचनालयाच्या वतीने आयोजित कोरोना योध्दा पुरस्कार वितरण प्रसंगी केले.
ते पुढे म्हणाले आज- काल समाजासाठी कार्य करणाऱ्या माणसांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारी माणसे समाजात आहेत.त्यातील एक आदर्श म्हणजे ए. डी. पाटील वाचनालय होय.या पुढे ही या वाचनालयाने समाजात कर्तबगार कार्य करणाऱ्या व्यक्तींची दखल घ्यावी.यावेळी कार्याचे कौतुक देखील केले.
प्रास्ताविकात बोलताना पत्रकार संभाजी कांबळे म्हणाले.”आजपर्यंत वाचनालयाच्या वतीने विविध उपक्रम राबवून समाजाची सेवा केली आहे.या पुढे ही समाजासाठी आपली तळमळ अखंड सुरू राहणार असल्याचे यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमात मानवाधिकार ट्रस्ट वरिष्ठ उपाध्यक्ष महंमदयासिन शेख, दैनिक लोकमतचे पत्रकार रमेश साबळे,दैनिक महाभारतचे प्रतिनिधी सुभाष चौगले यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास महंमद यासिन शेख,याकूब बक्षु,संस्थापक अद्यक्ष पत्रकार संभाजी कांबळे,माजी उपसरपंच गौतमी कांबळे,पोलीस पाटील राजाराम पोवार,श्रावण कांबळे,बाबुराव कांबळे,अक्षय कांबळे, शुभम पोवार,आशाताई कांबळे,मेघा कांबळे,आदी वाचनालयाचे सदस्य उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत संभाजी कांबळे यांनी तर आभार राजाराम पोवार यांनी मानले.