ताज्या बातम्यामहाराष्ट्र
संदिप बोटे यांची महाराष्ट्र एनजीओ समितीच्या राज्यसंपर्कप्रमूख पदी निवड

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
संदिप बोटे यांची महाराष्ट्र एनजीओ समितीच्या राज्यसंपर्कप्रमूख पदी निवड करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र एनजीओ समिती २०१४ पासून कार्यरत आहेत.या समितीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वयंसेवी संस्थेना मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांचा लाभ , सीएसआर निधी मिळवून दिला जातो.
यावेळी स्वराज्य निर्माण च्या माध्यमातून संदिप बोटे यांनी केलेल्या सामाजिक सांस्कृतिक महिला सबलीकरण,कला क्रीडा या कार्याची दखल घेऊन आज नाशिक येथे कोल्हापूर राज्यसंपर्कप्रमूख निवडपत्र राज्य अध्यक्ष मा.डाॅ.युवराज येडूरे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी राज्य उपाध्यक्ष डॉ.सुनिता मोडक राज्य चिटणीस लक्ष्मण मोडक यांच्यासह राज्य कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित होते.