ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडच्या श्री .व्यापारी नागरी सह, पतसंस्थेची 22 वी ऑनलाईन सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार.

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड तालुका कागल येथील मुख्य बाजारपेठेतील नागरिकांच्या जिव्हाळ्याची संस्था म्हणून ओळख असणाऱ्या व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 22 वी ऑनलाइन सर्वसाधारण सभा चेअरमन किरण गवाणकर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात व खेळीमेळीत पार पडली . प्रारंभी संचालक हाजी धोंडीबा मकानदार व महादेव तांबट यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने व नामदेव पाटील व यशवंत परीट यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे दिवंगत १२ सभासद हितचिंतक व थोर नेते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली .

संस्थेचे कार्यकारी संचालक सुदर्शन हुंडेकर यांनी अहवाल वाचन केले यावेळी बोलताना चेअरमन किरण गवाणर म्हणाले अहवाल सालात संस्थेस १० लाख ५५ हजार रुपये इतका विक्रमी नफा झाला असून संस्थेकडे आज रोजी १४ कोटी ५५ लाख रुपयांच्या ठेवी असून कर्ज ११ कोटी ११ लाख पैकी सोनेतारण कर्ज ६ कोटी २७ लाख वाटप केले आहे . संस्थेने ४ कोटी ४३ लाख इतकी इतरत्र गुंतवणूक केली असून राखीव व इतर निधी १ कोटी २०लाख रुपयांचा आहे तर वसूल भागभांडवल २६ लाख २५ हजार व खेळते भांडवल १७कोटी ६८लाख आहे . अहवाल सालात ऑडिट वर्ग ‘ अ ‘आहे .

यावेळी सभासदांनी विचारलेल्या ऑनलाईन प्रश्नांना चेअरमन व व्यवस्थापक यांनी समर्पक उत्तरे दिली . सभेत दीपक बहूदाणे, मन्सूर नायकवडी, कल्पना घायाळकर, पंडित मेंगाने, सुनील कांबळे, श्रीकांत खोपडे, नवनाथ डवरी यानीं चर्चेत सहभाग घेतला .सूत्रसंचालन चंद्रकांत.माळवदे ( सर )यांनी केले . प्रास्ताविक चेअरमन किरण गवाणकर यांनी ,स्वागत प्रशांत शहा यांनी तर आभार किशोर पोतदार यांनी मानले यावेळी सर्व संचालक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks