वाढदिवसादिवशी विजय मोरे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

कुर :
बसरेवाडी (ता-भुदरगड) येथील सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात आर्थिक संकटात असलेल्या बसरेवाडी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस(साहित्य) वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.त्यांनी याआधी ही विद्यार्थ्यांना वही,पेन अशा प्रकारचे शालेय साहित्य वाटप केले होते.
तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना आमदार प्रकाश आबिटकर,बाजार समिती संचालक कल्याणराव निकम, युवा नेते विरेंद्र मंडलिक यांच्यासह अनेक मंडळी यांनी त्यांना फोन व्दारे शुभेच्छा दिल्या व त्यांचे कौतुक केले.त्यांच्या वाढदिवस भुदरगड पंचायत समिती सभापती आक्काताई नलवडे यांचे पती युवा नेते प्रविण नलवडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.यावेळी शाळा समिती अध्यक्ष अश्विन मोरे,उपसरपंच रविंद्र देवेकर,सात्तापा पाटील,सुखदेव ढेरे,नामदेव साळवी,सागर मोरे आदिसह मित्र परिवार उपस्थित होता.